अपहरण करुन हत्येचा डाव, इमरान खान पाकिस्तानी सैन्यावर बरसले

इस्लामाबाद, दि.१५। वृत्तसंस्था लाहोर शहरात पाकिस्तानी सैन्य, इस्लामाबाद पोलीस आणि इमरान खान समर्थक आमने सामने आले आहेत. इमरान खान यांच्या अटकेसाठी इस्लामाबाद पोलीस लाहोरमध्ये तळ ठोकून आहेत. आता त्यांच्या मदतीला पाकिस्तानी सेना पोहोचली आहे. इमरान खान यांनी त्यांची अटक हे नाटक असून खरा हेतू हा अपहरण करुन हत्या करण्याचा असल्याचा आरोप केला. इमरान खान यांच्या अटकेवरुन लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. यामुळं इस्लामाबाद पोलिसांना इमरान खान यांना अटक करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळं पाकिस्तानी सेना देखील इमरान खान यांच्या अटकेसाठी लाहोरमध्ये दाखल झाली आहे.

इमरान खान यांनी ट्वीट करुन या संदर्भात भूमिका मांडली आहे. स्पष्टपणे अटक करण्याचं नाटक सुरु असल्याचं दिसत आहे. अपहरण करुन त्यांचा माझी हत्या करण्याचा डाव असल्याचं इमरान खान म्हणाले. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, पाण्याचा वापर केला जात आहे. यानंतर आता गोळीबार देखील सुरु झालाय, असं इमरान खान म्हणाले. सिक्युरिटी बाँडवर सही करुन दिलेली आहे पण डीआयजी यांनी घेण्यास नकार दिलेला आहे, असं खान म्हणाले. यावेळी इमरान खान यांनी पाकिस्तानी सेनेच्या प्रमुखांवर देखील टीका केली आहे. इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्यदलाचे जवान हे देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी लढत आहे, असं म्हटलं. इमरान खान समर्थक आणि पोलिसांच्यामध्ये लाहोरमध्ये वाद होत आहेत. लाहोरच्या जमान पार्कमध्ये युद्धभूमी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं इमरान खान म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *