देशात करोना, H3N2 आणि H1N1 चे तिहेरी संकट

नवी दिल्ली, दि.१५। वृत्तसंस्था भारतात करोनाचा धोका कमी झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत चाललं असताना आता पुन्हा एकदा देशात व्हायरसचा धोका वाढला आहे. देशात एकसाथ तीन व्हायरसचा धोका वाढल्याने रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये करोना म्हणजेच कोव्हिड -१९, H3N2आणि H1N1 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अधिक माहितीनुसार, १८ फेब्रुवारीपर्यंत देशभरात क१छ१ ची ९५५ प्रकरणं समोर आली आहेत. या संसर्गाला स्वाइन फ्लूही म्हटलं जातं. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘देशात सर्वाधिक क१छ१ प्रकरणं गी तामिळनाडूमध्ये ५४५, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १७०, केरळमध्ये ४२ आणि पंजाबमध्ये २८ रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाहीतर, आयडीएसपीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये देशात ेशासाचे रोग आणि इन्फ्लूएंझा (एआरआय/आयएलआय) ची ३ लाख ९७ हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी वाढून फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३६ हजार इतकी झाली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मार्चच्या पहिल्या ९ दिवसांतच इन्फ्लूएंझाची १ लाख ३३ हजार रुग्ण आढळून आली आहेत.

यामुळे देशावर धोका वाढत आहे. मॅक्स साकेतच्या इंटरनॅशनल मेडिसिनचे डायरेक्टर डॉक्टर रोमेल टिकू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ताप असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होत नाही आणि ती करण्याचीही गरज नाही. पण, देशात व्हायरल इन्फेक्शनची सरमिसळ सुरू आहे, हे खरं आहे. यामुळे करोना, , क३छ२ आणि क१छ१ च्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात वृद्ध आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना याचा धोका जास्त असून रुग्णालयात दाखल लोकांची संख्याही यामुळे वाढत आहे. स्वाईन फ्लू H1N1, इन्फ्लुएंझा क३छ२ किंवा करोना हे तिन्ही संसर्गजन्य आजार असून विषाणूंद्वारे या रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे मास्क वापरणं यापासून वाचण्यासाठी उत्तम आहे. देशात आतापर्यंत या संसर्गामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे. अशात मास्क घालून घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *