कलंकशोभा!

काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात होते. त्यांची नागपुरात जंगी सभा झाली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चागलेच तोंडसुख घेतले. आपले सरकार गेल्यामुळे व ते जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचे ठाम मत असल्यामुळे त्यांच्यावरचा ठाकरे यांचा राग आपण समजू शकतो. त्याला उत्तर म्हणून फडणवीस यांनीही टीका करावी यात या टीकांमुळे जनतेचे चांगलेच मनोरंजन होते.

एक आरोप केला की फडणवीस त्वरित त्याचे उत्तर देतात. काल नागपुरातल्या एका सभागृहात आपल्या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत, असा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा नागपुरातही खापवून घेणे शक्य नाही. उद्धव ठाकरे यांनी केलेली कलंकशोभा देवेंद्र फडणवीस यांनी सव्याज फेडून टाकली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब म्हणतात आणि उद्धव ठाकरे सहन करतात याला कलंक म्हणतात, असे फडणवीस यांचे मत आहे. फडणवीस यांनी इतरही अनेक आरोपांची मालिका उद्धव ठाकरे यांच्या कलंकशोभेने वर्तवून टाकली आहे.

नागपूरचे खासदार केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषेबाबत नाराजी व्यक्त केली. खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, असे गडकरी म्हणाले. टीका करायची म्हटली तर दोन्ही बाजूंनी अनेक विषयांवर टीका करता येईल. उद्धव ठाकरे यांची खुर्ची गेल्यामुळे व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर ठाकरे यांचा राग असणे स्वाभाविक आहे. पण हा राग व्यक्त करणाऱ्या अनेक ज्यांनी ज्यांनी ते गाणे म्हटले ते गाणे लोकांवर म्हटलेले नाही. या कलक प्रकरणामुळे अनेक प्रश्न उभे राहिले असे फडणवीस म्हणतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कलांकावर अनेक खुलासे केले आहेत. आजकाल राजकीय भाषणावरही नोटीस, खटले दाखल होत आहेत. उद्या असाच खटला उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल झाला तर विनाकारण कोर्टाचे हेलपाटे मारावे लागू शकतात. या कलंकाशिवाय उद्धव ठाकरे यांची मर्दाची औलाद असाल तर सरकारी मदत न घेता मैदानात या, असे आव्हानही दिले.

जे जे मुद्दे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले त्यपैकी काही मुद्दे निश्चितच महत्त्वाचे आहेत. पण त्यासाठी वापरात आलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही एवढेच आमचे सांगणे आहे. देवेंद्र फडणवीस नागपुरात नागपूरच्या नगरसेवकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सतत वर चढत गेले. त्यांची प्रतिमा धडाडीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षातील मुलुखमैदानी तोफ अशी आहे. अशा या मुलुखमैदानी तोफेला देशी कट्टा समजून उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका बहुसंख्य वैदर्भीयांना मान्य नाही. ज्या उद्देशाने उद्धव ठाकरे आपला दौरा करत आहेत त्या दौऱ्यात ते टीका करतीलच पण त्या टीकेची पातळी निश्चितच समर्थनीय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची टीका आतापर्यंत झालेली नाही, बाकी आता काय म्हणावे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *