ओडिशा, दि.१२। वृत्तसंस्था ओडिशातील बालासोर येथे गेल्या महिन्यात झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताप्रकरणी सीबीआयने बुधवारी ७ अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये अटक करण्यात आलेल्या ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.दक्षिण पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांना अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे कारण विचारले असता ते म्हणाले की, हे अधिकारी सतर्क असते तर दुर्घटना घडली नसती. ७ जुलै रोजी सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा समावेश होता. या तिघांवरही सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. या तिघांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते हे तिन्ही आरोपींना माहीत होते, असा दावाही सूत्रांनी केला आहे. रेल्वे अपघातात २९३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि १,००० हून अधिक लोक जखमी झाले.
रेल्वे बोर्डाने माहिती दिली होती की कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली आणि नंतर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट कोरोमंडलच्या बोगीला धडकली.रेल्वे बोर्डाने माहिती दिली होती की कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली आणि नंतर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट कोरोमंडलच्या बोगीला धडकली. सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे बालासोर दुर्घटना सीबीआय या अपघाताचा तपास करत आहे. रेल्वे बोर्डाच्या वतीने रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) कडूनही चौकशी करण्यात आली आहे. ३ जुलै रोजी, उठड ने बोर्डाला ४० पानांचा अहवाल सादर केला. रिपोर्ट्सनुसार, लेव्हल-क्रॉसिंग लोकेशन बॉक्सच्या आत वायरचे चुकीचे लेबलिंग केल्यामुळे स्वयंचलित सिग्नलिंग सिस्टम बिघडली. ज्यामुळे अपघात झाला.क्रॉसिंग लोकेशन बॉक्समधील तारांचे चुकीचे लेबलिंग वर्षानुवर्षे आढळले नाही. देखभालीदरम्यानही त्यात चूक झाली.