बेंगळूरू,, दि.१८। वृत्तसंस्था बंगळुरूत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. विरोधी पक्षांच्या ऐक्यासोबत जागावाटप आणि आघाडीच्या नावाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान या बैठकीला हजर राहिल्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा निर्धार व्यक्त केला. आज बेंगळूरू येथे विरोध पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलो .
यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकाजर्ुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन आणि विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत भेटीगाठी झाल्या. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून एकत्र लढू आणि जिंकू असा निर्धार करण्यात आला. विरोधी आघाडीचे नाव खछऊखठ ेवण्याचा प्रस्ताव, ठगऊ ने म्हटले- भाजपला आता इंडिया म्हणण्याचाही त्रास होईल बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याची दुसऱ्या दिवशीची बैठक सुरू आहे. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधात २६ पक्ष एकत्र आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.