नवी दिल्ली, दि.१८। वृत्तसंस्था बंगळुरूमध्ये विरोधकांची दोन दिवसीय बैठक दुपारी झाली. त्यानंतर दिल्लीत अशोका हॉटेलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील असलेल्या ३८ पक्षांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. २५ वर्षे आणि केंद्र सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा छऊआघाड ीचे सरकार स्थापन करण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. छऊची स्थापना मे १९९८ मध्ये झाली होती. तेव्हा त्याचे संयोजक जॉर्ज फर्नांडिस होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे नेते अजित पवार-प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच या बैठकीला उपस्थित आहेत.
पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या पहिल्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनीही हजेरी लावली होती. तर, उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून शिंदे एनडीएमध्ये दाखल झाले आहेत.बैठकीपूर्वी पंतप्रधानांनी सोशल मीडियावर लिहिले – ही अत्यंत आनंदाची बाब आहे की आज दिल्लीतील बैठकीत देशभरातील आमचे मौल्यवान एनडीएचे सहकारी सहभागी होतील. आमची ही युती राष्ट्रीय विकास आणि प्रादेशिक स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. गेल्या काही वर्षांत एनडीएचे जुने मित्र पक्ष वेगळे झाले आहेत. यामध्ये कर्नाटकातील जनता दल (संयुक्त), महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा समावेश आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर प्रदेशमध्ये ओपी राजभर यांचा सुभासपा, बिहारमध्ये जितन राम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. एलजेपी (रामविलास) चे अध्यक्ष चिराग पासवान आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपती नाथ पारस हेही बैठकीला पोहोचले.