जम्मू-काश्मीर, दि.१८। वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील सिंध्रा भागात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कारवाईत मारले गेलेले सर्व दहशतवादी परदेशी आहेत. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू झालेली ही चकमक मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होती. नऊ तास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या कारवाईत भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू- काश्मीर पोलिसांचे जवान सहभागी झाले होते.
भारतीय लष्कराने सांगितले की, ऑपरेशन त्रिनेत्र खख अंतर्गत, पुंछ भागात वेढा घातल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. १६-१७ जुलैच्या मध्यरात्री लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान एके-७४ रायफल आणि ११ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.