नवी मुंबई

नवी मुंबईत टांगा पलटी

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापताना दिसत आहे. भाजपचे अधिक उमेदवार विजयी झाल्यानंतर महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांचा “जुना घोडे फिरवताना” असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत “टांगा पलटी” या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर हा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना अनेकांनी त्याचा थेट राजकीय संदर्भ लावला असून, काही जण भाजपच्या यशाशी त्याची सांगड घालत आहेत. तर काहींनी हा व्हिडिओ जुन्या घटनेचा असून सध्याच्या राजकारणाशी त्याचा संबंध नसल्याचेही नमूद केले आहे.

दरम्यान, या व्हिडिओवरून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून, नवी मुंबईतील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *