५०० रुपयात एक एकर जमीन ६० वर्षांचा लिजवर
नवी मुंबई:मुरबाड तालुक्यातील शिरोशी गावात खासगी वनांसा’ी असलेली जागा वन मंत्री गणेश नाईक यांनी बेकायदा घेतली असून या जमिनीच्या साताबार्यावर भोगवटादार म्हणून चक्क वन मंत्र्यांचे नाव आहे. याच भागात असलेल्या काही जमिनी सुबह अॅग्रो लिमिटेड या कंपनीने प्रती एकर ५०० रुपये दराने ६० वर्षांच्या लिजवर घेतली आहे. या कंपनीचे संचालकही वन मंत्री गणेश नाईक हेच आहेत. हा मो’ा जमीन घोटाळा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मिरजे यांनी करुन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मुरबाड तालुक्यात गणेश नाईक यांनी मो’्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. शिरोशी गावातील गट क्रमांक ४२६/ब, ३९७/ब, ४२८/ब, ४२८/अ, ४३०, ४३१, ४३३ या जमिनीवर महाराष्ट्र खासगी वने अधिनियमातील तरतुदीस अधीन असे नमुद करण्यात आले आहे. ही जागा खासगी वनांसा’ी असली तरी जागेच्या उतार्यावर वन मंत्री गणेश नाईक यांना भोगवटादार म्हणून दाखवण्यात आले आहे. हा मो’ा गैरव्यवहार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासा’ी आपण वन विभाग आणि ‘ाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. मात्र वन खाते गणेश नाईक यांच्याकडे असल्याने चौकशीमध्ये मो’ा अडथळा होत आहे. याच भागातील गट क्रमांक ४३१ आणि ४७५ मधील जागा सुबह अॅग्रो लिमिटेड या कंपनीला ६० वर्षांच्या लिजवर प्रती एकर ५०० रुपये दराने दिली आहे. इतक्या कवडीमोल दरात ही जागा कशी देण्यात आली, याची विचारणाही आपण जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. मात्र त्याचे अपेक्षीत उत्तर दिले जात नाही, असा आरोप बाळासाहेब मिरजे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यांच्या या घणाघाती आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
…तो पर्यंत नाईकांचा राजिनामा घ्या
गणेश नाईक यांनी केलेल्या या जमीन खरेदीची चौकशी करण्याची मागणी आपण वन खाते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार केली आहे. मात्र अपेक्षीत चौकशी केली जात नाही. प्रशासन वेळकाढूपणा करीत आहे. गणेश नाईक वन खात्याचे मंत्री असल्याने प्रशासन दबावाखाली आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत नाईक यांचा राजिनामा घेण्यात यावा, अशीही मागणी बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे.
महापेतील दोन कार्यालयांची खरेदी वादग्रस्त
महापे एमआयडीसीमध्ये कामधेनू बिल्डरकडून २२ माळ्याचा टॉवर उभा करण्यात आला आहे. या टॉवरमध्ये गणेश नाईक यांनी दोन कार्यालय घेतली आहेत. हा व्यवहार करताना बिल्डरने नाईक यांच्याकडून रक्कम आरटीजीएसने आल्याचे दाखवले आहे. मात्र आरटीजीएसची कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या व्यवहारातही काहीतरी गडबड असल्याचा संशय असल्याने त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे.




