मुरबाड

मुरबाड तालुक्यातील माळ येथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी वायरमनचा मृत्यू; दुरुस्तीचे काम करताना विजेचा जबर शॉक

मुरबाड, दि.२१,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील माळ सुकाळवाडी भागात एका आदिवासी वायरमनचा विजेचा जबर शॉक लागून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी वायरमन चिमा जानू पारधी हे माळ एसटी बस स्टॉपजवळील लाईट डीपीवर दुरुस्तीचे काम करत होते. येथे लाईट नसल्यामुळे ते डीपीवर चढून काम करत होते. यावेळी विजेचा प्रवाह चालू झाल्याने अचानक त्यांना विजेचा प्रचंड शॉक बसला आणि ते जागेवरच ठार झाले.
या घटनेची तक्रार टोकावडे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास टोकावडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक हे करत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *