मुरबाड,दि.५,प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ही बातमी समजताच देशभर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहते, कार्यकर्ते यांनी मुरबाड शहर बाजारपेठ बंद ठेवून त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. दि.४ जाने. रोजी मुरबाड तालुका सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहरातील विविध पक्षाचे, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवरांनी अजितदादांना आदरांजली वाहिली.
मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार गोटीराम पवार, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष किसन तारमळे, आरपीआय सेक्युलरच्या ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे, प्रा.धनाजी दळवी, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बोस्टे, राष्ट्रवादी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतिक हिंदुराव, शिवसेना तालुका पक्षाचे तालुका प्रमुख संतोष विशे, उल्हास बांगर, उपजिल्हा प्रमुख कांतीलाल कंटे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दिपक पवार, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दिनेश उघडे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक नेते, नगरसेवक, समाजसेवक, मुरबाडकर नागरिक मोठ्या संख्येने दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.




