नवी मुंबई

वाशी येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रभात फेरी

नवी मुंबई:वाशी येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आज प्रभात फेरीचे आयोजन वाशी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले होते. नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत वाशीतील सेंट मेरी शाळेच्या सहकार्याने आरएसपी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती.

या वेळी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळेबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीमधे २५० ते ३०० विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. ही प्रभात फेरी ही सेंट मेरी शाळा सेक्टर १० येथून चालू होवून शबरी हॉटेल-फायर ब्रिगेड चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी समाप्त झाली. या वेळी वाहन चालकांना.. शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्या मार्फत गुलाबाचे फुल देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक वाजे, पो.हवा. महेश पाटील,पो.ना. चव्हाण , आदी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *