नवी मुंबई:महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व अतिक्रमण उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत प्रकाश कृष्णा गुप्ता व विकास कृष्णा गुप्ता, एस.एस.टाईप, रूम नं 111, सेक्टर – 3, कोपरखैरणे, नवी मुंबई यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये दिनांक 11-02-2026 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर निष्कासनाची अंशतः तोडक कार्यवाही करण्यात आली.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत ऊ धांडे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी व कर्मचारी व न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 8 मजूरांचा व 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर 01 चा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.




