नवी मुंबई

मुंबईत ‘वारणा आईस्क्रीम’ चा दिमाखदार शुभारंभ, तीन वर्षात तीन हजार विक्री केंद्राचे उद्दिष्ट: आमदार डॉ.विनय कोरे यांची माहिती

नवी मुंबई:सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या वारणा समूहाने आता आईस्क्रीम क्षेत्रात दमदार पाऊल टाकले असून मुंबई येथे ‘वारणा आईस्क्रीम’ चा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला.

नवी मुंबईतील तुर्भे येथे वारणा आईस्क्रीमच्या उद्घाटन निमित्ताने संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की, वारणा दुधाच्या गुणवत्तेवर ग्राहकांचा विश्वास आहेच, आता तोच दर्जा आईस्क्रीमच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवला जाईल. वारणा ब्रँड पदार्थाची शुद्धता आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई शाखेने सध्या ११ वितरकांमार्फत काम सुरू केले असून, लवकरच ही संख्या २५ वर नेण्यात येणार आहे. सध्या ३०० दुकानांतून विक्री सुरू होत असून पुढील तीन वर्षांत संपूर्ण मुंबईत ३००० विक्री केंद्रे सुरू करण्याचा मानस व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. यावेळी संघाचे कार्यकारी सुधीर कामेरिकर यांनी मुंबईत ५० नव्या फ्रॅचायझी आणि मेट्रो स्टेशन्सवरील शॉप मध्येही वारणा आइसक्रीम उपलब्ध होणार आहेत.पहिल्या वर्षात १५ कोटींच्या विक्रीचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली.

बटरस्कॉच, चोको चिप्स, चॉकलेट, केशर पिस्ता, मॅगो, पिस्ता, व्हॅनिला, काजु किशमीश, स्पॉयसी गव्हा, राजभोग अमेरीकन नट, अफगाण ड्रायफूट, बेल्जियम चॉकलेट या फ्लेवर्स मध्ये आईसक्रीम उपलब्ध आहेत. सुरुवातीला चर्चगेट ते विरार, कुलाबा ते कर्जत, सीएसएमटी ते पनवेल उरण व रायगड जिल्हा या विभागात प्राधान्याने विक्री सुरू करण्यात येणार आहे याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरात वारणा आईसक्रीम विक्रीस उपलब्ध करणार असल्याचे मुंबई विभागाचे जनरल मॅनेजर मार्केटिंग ए.के. सिंग यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमास असि. जनरल मॅनेजर एस ए तासकर, मुंबई विभागीय मॅनेजर एन.बी. ढमाळ, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, असि.मार्केटिंग मॅनेजर आर. व्ही.देसाई, फॅक्टरी मॅनेजर, श्रीधर बुधाले,असि.मॅनेजर प्रोडक्शन प्रीतिन बासटवार, मॅनेजर पंकज वाणी,अधिकारी अशोक नांगरे, वारणा डेअरी आणि ॲग्रो इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर युवराज मुळीक, फॅक्टरी मॅनेजर अनिकेत देशमुख, मार्केटिंग ऑफिसर, कर्मचारी व वितरक आदी उपस्थित होते.

 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *