नवी मुंबई:वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नेरुळ येथील सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री लोकनेते नामदार श्री गणेश नाईक यांची भेट घेतली.
यावेळी नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकासंदर्भात महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. नेरुळ स्थानकावरून सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत सी.एस.टी. किंवा वडाळा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलची नवीन फेरी सुरू करण्यात यावी, तसेच नेरुळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी एक्सेलेटर (सरकते जिने) सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागासोबत मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन गणेश नाईक यावेळी दिले.




