अकोला जिल्हा

अडगावात भीषण आग…आगीत . तीन जणांचा मृत्यू..

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे,तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु दि 12/2//2026 आज संध्याकाळी 7 वाजता आठवडी बाजारा लगत असलेल्या शेख इब्राहिम यांचे घराला लागलेल्या आगीत घरात राहणारे भाडेकरू गंभीररित्या जळाले.. आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी अथक परिश्रम केले ग्राम पंचायत ने ताबडतोब पाणी पुरवठा सुरु केला तसेच अग्निशामक दलाच्या तेल्हारा आणि अकोट येथून दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या परंतु घरात डीझेल चा साठा असल्याने आगीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती नागरिकांनी दिली त्यामुळे घरात अडकलेले स्वरा प्रभुदास सोळंके वय 6,रत्ना उकर्डा चव्हाण 55 , अनिल उकर्डा चव्हाण 27 हे भाडेकरु गंभीररित्या जळाले त्यात स्वरा आणि अनिल यांचा जळाल्याने मृत्यू झाला आहे तर रत्ना चव्हाण यांची प्रकृती गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत घटनास्थळी एस डी पी ओ निखिल पाटील, तहसीलदार महेश रामगुंडे,ठाणेदार गजानन राठोड, उपनिरीक्षक गिलबिले, तलाठी देशमुख,पोलीस पाटील हागे यांची उपस्थिती होती तर पोलीस विभागाच्या फॉरेन्सिक लॅब ची व्हन सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे त्याचा पंचनामा सुरु आहे ..आगीत जखमी झालेल्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे कोणीही हजर नसल्याने त्यांचेवर प्राथमिक उपचार होऊ शकला नाही नंतर त्यांना ताबडतोब अकोट नेण्यात आले

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *