ज्ञानवापीमध्ये ASI सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाची २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थगिती

वाराणसी, दि.२४। प्रतिनिधी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण च्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज २४ जुलै रोजी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. सर्वोच्च न्यायालयाने मशिदीतील एएसआयच्या सर्वेक्षणाला २६ जुलैपर्यंत म्हणजेच २ दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वेक्षण करू नये, असे सांगितले. या काळात मशीद समितीची इच्छा असेल तर ती वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. वाराणसी न्यायालयाने एएसआयला मशिदीत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. २४ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली, तेव्हा डख टीम ज्ञानवापीमध्ये सर्व्हे करत होती. सर्वोच्च न्यायालयाने तेथे कोणत्याही प्रकारच्या उत्खननावर तातडीने बंदी घातली. दुपारी २ वाजता पुन्हा सुनावणी करू, असे सांगितले. मात्र सकाळी ११.५० च्या सुमारास न्यायालयाने सर्वे क्षणाला स्थगिती देण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *