नवी दिल्ली, दि.२४। वृत्तसंस्था आपचे खासदार संजय सिंह हे सभापती जगदीप धनखड यांच्या खुर्चीजवळ पोहोचले होते. यानंतर सभापतीही आपल्या खुर्चीवरून उठले. – ऊर्ळींूर चरीरींहळ आपचे खासदार संजय सिंह हे सभापती जगदीप धनखड यांच्या खुर्चीजवळ पोहोचले होते. यानंतर सभापतीही आपल्या खुर्चीवरून उठले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मणिपूरच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.मणिपूरच्या मुद्द्यावर सभापती जगदीप धनखड यांच्याशी वाद घातल्याबद्दल आप खासदार संजय सिंह यांना राज्यसभेतील पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभापतींच्या खुर्चीजवळ जाऊन संजय सिंह वाद घालत होते.