नवी दिल्ली, दि.२४। वृत्तसंस्था आम आदमी पार्टीचे (झ) नेते सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर आज (२४ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने प्रकृतीचे कारण देत जैन यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या प्रकरणातील शेवटची सुनावणी १० जुलै रोजी झाली होती, ज्यामध्ये न्यायालयाने त्यांच्या जामीनाला २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. जैन यांचे वकील एएम सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले होते की, जैन यांना तीन रुग्णालयांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा. दरम्यान, २१ जुलै रोजी जैन यांच्यावर दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जैन यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.यापूर्वी २६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना वैद्यकीय स्थितीच्या आधारे सहा आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता. ११ जुलै हा त्यांच्या जामिनाचा शेवटचा दिवस होता.