जुनागड, दि.२४। प्रतिनिधी गुजरातमधील जुनागडमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे काडियावल परिसरात एक इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली ४ जण अडकले आहेत. ही इमारत भाजी मंडईजवळ होती आणि खाली दुकाने होती. भाजी मंडईमुळे येथे मोठी गर्दी असते. अशा स्थितीत अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली १२-१५ लोक दबले गेल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे. पोलिस आणि एसडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत खूप जुनी होती. त्यात राहणाऱ्या लोकांना महापालिकेने नोटीसही दिली होती. शनिवारी शहरात आलेल्या पुरामुळे त्याचा पाया आणखीच कमकुवत झाला होता. त्यामुळे आज ही इमारत कोसळली.