पुणे, दि.३। प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक, कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विेशातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. महानोर हे विधान परिषदेचे आमदारही होते. १९९१ साली महानोर यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आपल्या तरल आणि मनाला भिडणाऱ्या काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी अढळ स्थान प्राप्त केले. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.