सलग दुसऱ्या दिवशी “बेस्ट’ कामगारांचा संप सुरूच

मुंबई, दि.२। प्रतिनिधी बेस्ट मधील कंत्राटी चालकांचा आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. बेस्टच्या घाटकोपर डेपोमधील कंत्राटी चालक काल सकाळपासून संपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. चालकांच्या या संपामुळे बस सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

देवनार, आणि, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहे. याचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना बसतोय. पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते.या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत.त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत . आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही. तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *