नवी दिल्ली, दि.४। वृत्तसंस्था आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीही परत मिळणार आहे. राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने २३ मार्च रोजी दोन वर्षाची शिक्षा सुनावल्या नंतर लोकसभेची खासदारकी निलंबित करण्यात आली होती. आता कोर्टाने त्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा लोकसभेची खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्रीय काँग्रेस आणि विरोधकांची इंडिया यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.