मुंबई, दि.४। प्रतिनिधी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून १५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एटीएसने जोरदार कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले आहे. यात त्यांच्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीनुसार या दहशवाद्यांची महाराष्ट्र एटीएसने कसून चौकशी केली असता त्यांचा १५ ऑगस्टला देशात दहशतवाद्या कारवायांचा मोठा प्लॅन असल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारतासह इस्रायलही असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.