इंफाळ, दि.६। प्रतिनिधी मणिपूरमध्ये ३ मेपासून कुकी-मेईतेई समुदायामध्ये सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी उठझऋ च्या आणखी १० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील केवळ खोऱ्यातील पोलिस ठाण्यांमध्येच नव्हे, तर डोंगराळ जिल्ह्यांमध्येही लूट झाल्याचे पोलिस नियंत्रण कक्षाने शनिवारी सांगितले. ही शस्त्रे जप्त करण्यासाठी सुरक्षा दल डोंगरी आणि खोऱ्यात सतत शोध घेत आहेत. डोंगरी जिल्ह्यांतून आतापर्यंत १३८ शस्त्रे आणि १२१ दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.तर खोऱ्यातील जिल्ह्यांतून १०५७ शस्त्रे आणि १४,२०१ दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.नियंत्रण कक्षाने अशीही माहिती दिली की ५ ऑगस्ट रोजी इंफाळ पश्चिम येथील तुपोकपी पोलीस स्टेशनमध्येही शस्त्र चोरण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पोलिसांनी हिसकावून घेतलेली चारही शस्त्रे जप्त केली.