लखनऊ, दि.६। वृत्तसंस्था वाराणसीमध्ये ज्ञानवापी परिसरात सुरू असलेल्या सर्वे क्षणाच्या दुसऱ्या दिवशी एएसआयला देवता, तुटलेल्या त्रिशुळाचा भाग सापडला. एएसआयने मुस्लिम पक्षाचे ५ सदस्य आणि एका वकिलाच्या उपस्थितीत दोन शिफ्टमध्ये ७ तास हे सर्वेक्षण केले. यादरम्यान ज्ञानवापीच्या मुख्य घुमटाचे तळघरही उघडण्यात आले. पाहणीत उपस्थित असलेल्या या प्रकरणातील फिर्यादी सीता साहू म्हणाल्या की, तळघरात मंदिराच्या तुटलेल्या खांबाचे अवशेष, दोन फुटांच्या त्रिशुळासह ४ फुटांची मूर्ती, वेगवेगळ्या आकाराचे ५ कलश सापडले आहेत. तसेच अनेक गोष्टीही सापडल्या आहेत. शनिवारी सकाळी मुस्लिम पक्षाकडून तळघराची चावी दिली जात नव्हती. नंतर एएसआयला चावी दिली. मुस्लीम पक्षाचे वकील मुमताज अहमद म्हणाले की, आम्ही सर्वेक्षणावर समाधानी आहोत. कालपर्यंत आम्ही त्यात सामील नव्हतो, पण आता आहोत.ज्ञानवापी परिसराचे सर्वे क्षण शास्त्रोक्त पद्धतीने केले जात आहे. त्याचे थी- डी इमेजिंगही केले जात आहे. एएसआयने येथे छायाचित्रे घेतली आणि सापडलेल्या वस्तूंची तपशीलवार नोंद केली. सर्वेक्षणादरम्यान, हिंदू- मुस्लिम बाजूच्या १६ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.