मुंबई , दि.६। प्रतिनिधी देशातील रेल्वे स्थानकांची सुसज्ज्ाता आणि आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या “अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अिेशनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.यापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यातून विविध राज्यांतील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून या स्थानकांमध्ये मुलभूत पायाभूत तसेच अद्ययावत सुविधा आणि रेल्वे मार्गांची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी “अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ झाला आहे. या योजनेतून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार आहे, शिवाय प्रवाशांना दर्जे दार सुविधा मिळणार आहेत.