नवी दिल्ली, दि.१०। वृत्तसंस्था विरोधकांनी आणलेल्या अविेशास प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. लोकसभेत त्यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी ते सभागृहात येताच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. देशातील जनतेने आमच्या सरकारवर जो विेशास दाखवला आहे, त्याबद्दल देशातील कोट्यवधी भारतीयांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. देव खूप दयाळू आहे. देवाची इच्छा असते की ते कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून आपल्या इच्छेची पूर्तता करता. मी हा देवाचा आशीर्वाद मानतो की, देवाने विरोधकांना अविेशास प्रस्ताव आणण्याची बुद्धी दिली.
२०१८ मध्येही हा देवाचाच आशीर्वाद होता आणि विरोधक आमच्या सरकारविरोधात अविेशास प्रस्ताव घेऊन आहे. तेव्हाही मी म्हणालो होतो की हा आमच्या सरकारचे फ्लोअर टेस्ट नसून विरोधकांची फ्लोअर टेस्ट आहे. आणि झालेही तसेच विरोधकांकडे जितकी मते होती तितकीही त्यांना मिळाली नाही. त्यानंतर जनतेनेही त्यांच्यावर अविेशास दर्शवला आणि एनडीए आणि भाजपलाही जास्त जागा मिळाल्या. एक प्रकारे विरोधकांचा अविेशास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. एनडीए आणि भाजप २०२४ च्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून पुन्हा सत्तेत यावे हे तुम्ही ठरवल्याचे मला दिसत आहे.