आयुष्मान भारत योजनेत घोटाळा!

नवी दिल्ली, दि.१०। वृत्तसंस्था भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ने आपल्या अहवालात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत अनेक घोटाळे झाल्याचे उघड केले आहे. ज्यामध्ये लाभार्थी ओळख प्रणालीद्वारे सर्वात मोठी त्रुटी समोर आली आहे की, योजनेच्या सुमारे ७.५० लाख लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर एकच होते. कॅगने आपला अहवाल ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केला, ज्यामध्ये सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२१ या कालावधीतील कामगिरी लेखापरीक्षण निकालांचा समावेश आहे.

कॅगच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या या ऑडिट रिपोर्टमध्येही हे आकडे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार ७ लाख ४९ हजार ८२० लाभार्थी इखड डेटा बेसमध्ये याच क्रमांक ९९९९९९९९९९ शी लिंक करण्यात आले होते. याशिवाय १.३९ लाख लाभार्थी ८८८८८८८८८८ क्रमांकाने जोडले गेले असून ९६,०४६ लोक ९००००००००० या क्रमांकाने जोडले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *