लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी विेशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणून गेल्या १० वर्षांतील ते त्यांचे शेवटचे भाषण! या भाषणात त्यांची देहबोली वेगळीच भासत होती. त्यांनी आपल्या साडेनऊ वर्षांच्या कारकीर्दीचा आराखडा जनतेसमोर ठेवला. पुढच्या वर्षी निवडणुकीनंतर पुन्हा आपणच या किल्ल्यावरून भाषण देणार आहोत याची ग्वाही त्यांनी दिली. यापुढील निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीने त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे, हे त्यांच्या देहबोलीतून दिसून येत होते. कालचे भाषण ज्या गतीने विकसित होत गेले ती गती पूर्वीसारखी नव्हती.
पंतप्रधानांजवळ भारतीय जनता पक्षाची सुदृढ यंत्रणा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी विेशासाचे पाठबळ उभे आहे. पण विरोधकांनी समोर जी अभेद्य एकजूट उभी केली आहे त्यामुळे पुढील निवडणूक विशेष काही घडले नाही तर मुद्द्यांवरच होईल हे स्पष्ट होते. २०१४ साली काँग्रेसला हरवायचे होते आणि समोर ओशस्त करणारा पक्ष होता. अनेक ओशासने देणारा नेता होता म्हणून भाजपला मोठा विजय मिळाला. २०१९ साली मोदी यांनी पुन्हा बरीच ओशासने आपल्या भाषणातून दिली. पाकिस्तानात घुसून पाकड्यांना पाणी पाजले. यामुळें जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणावर मते देऊन विजयी केले. पूर्वीपेक्षा जास्त मते मिळाली. आता मोदी यांनी २०१४ पासून दिलेली ओशासने, त्याची अंमलबजावणी, त्यात आलेले यश – अपयश याचा हिशेब जनता करत आहे. पण या सर्वांपेक्षा आपसात भांडणारे विरोधी पक्ष एका आघाडीत सामील झाले. ज्या काँग्रेसला पराभूत करून दिल्ली आणि पंजाब ही दोन राज्ये आप ने जिंकली तो आप ही आपोआप विरोधकांच्या इंडियात सामील झाला.
हिंदी बेल्टचा पंतप्रधान मोदी यांना भरपूर पाठिंबा मिळाला होता. त्यावेळी नितीश कुमार त्यांच्याबरोबर होते. आता नितीश कुमार नव्या आघाडीचे मुख्य नेते झालेले आहेत. गेल्या निवडणुकीत मोदी यांना हिंदी बेल्टमध्ये जवळजवळ ९० टक्के खासदार मिळाले. यात विरोधकांच्या आपापसातील मतभेदांचा आणि मतविभाजनाचा लाभ भाजपला झाला होता. पुढील निवडणुकीत ४०० जागांवर भाजपविरुद्ध इंडिया असा मुकाबला होण्याची चिन्हे आहेत. याचा फायदा विरोधकांना मिळू शकतो. दक्षिण भारतातील कर्नाटकही हातातून गेलेले आहे. लवकरच होणाऱ्या ५ विधानसभांच्या निवडणुकीत भाजपपेक्षा विरोधकांचे पारडे जड दिसते. त्यामुळे सांगण्यासारखे काही नसले तरी आपल्याकडे मोदी आहेत आणि मोदींच्या चेहऱ्यावर आम्ही जिंकू शकतो, असा भाजपला विेशास वाटतो. एवढे सर्व असले तरी यावेळी मुकाबला तगडा आहे, याचे भान खुद्द मोदी यांची देहबोली दाखवीत होती. यामुळेच ९ तारखेला अविेशास ठरावाचे उत्तर देताना केलेले २ तास १४ मिनिटांचे भाषण आणि कालचे लाल किल्ल्यावरील ९० मिनिटांचे भाषण एखाद्या निवडणुकीच्या सभेसारखे वाटले हे मुद्दाम नमूद केले पाहिजे.
परिवारवादाविरुद्ध पंतप्रधानांनी कितीही घोषणा केल्या तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सगळीकडेच परिवारवाद आहे. भ्रष्टाचाराचे म्हणाल तर ज्यांच्या नावाने बोंबाबोंब केली त्या हेमंता बिस्वा सर्मापासून महाराष्ट्रातील काही नेत्यांपर्यंत आता मोदींच्या बाजूने आहेत. हे सर्व डोळ्याने दिसत असताना आता पंतप्रधानांना पुढील निवडणूक केवळ आपल्या चेहऱ्यावर लढवायची आहे हे समजून चुकले आहे. यामुळे मोदी यांनी आपल्या भाषणात मी, आणि मीच असे उद्गार काढले असावेत. आज मोदी यांच्यानंतर अमित शहा सोडल्यास बाकी सर्व नेतृत्वाचे खच्चीकरण झालेले दिसते. तरी सरकारच्या समर्थकांना मोदी यांच्याकडून विजय मिळू शकेल, असा विेशास वाटतो. विरोधक म्हणतात, लाल किल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचे भाषण आहे. पण मोदी आत्मविेशासाने म्हणतात, पुढील वर्षी मीच येणार आणि लाल किल्ल्यावरून भाषण देणार. पुढील २-३ महिन्यात ५ राज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. सरकारजवळ एकच जमेची बाजू आहे ती म्हणजे मोदींचा चेहरा. विरोधकांची एकजूट आणि मोदींचा आत्मविेशास यांची लढाई पाहण्यास तयार राहिले पाहिजे. मोदींच्या लाल किल्ल्यावरील चिंतनाचे सगळे सूत्र असे आहे.