नवी दिल्ली, दि.२०। वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. ३९ सदस्यांच्या या समितीत सोनिया, राहुल, प्रियंका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही समितीत कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शशी थरूर यांनाही या समितीत स्थान दिले आहे. खरगे यांनी रविवारी जाहीर केलेल्या समितीमध्ये मध्य प्रदेशातील कमलेेशर पटेल आणि छत्तीसगडमधील ताम्रध्वज साहू यांना स्थान देण्यात आले आहे. एकूण ८४ नावे आहेत. यामध्ये उथउ सदस्य, स्थायी निमंत्रित, सरचिटणीस, विशेष निमंत्रित आणि प्रभारी यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खरगे यांनी २३ सदस्यीय उथउ बरखास्त करून त्याजागी ४७ सदस्यीय सुकाणू समिती नेमली होती. कार्यसमिती म्हणजेच उथउ ही काँग्रेस पक्षातील सर्वोच्च कार्यकारी संस्था आहेर्.