“आप’ वगैरेंचा ताप!

काही दिवसांपूर्वी भारतातील विरोधी पक्षांनी एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी खछऊखनावाच्य ा २६ पक्षांच्या ग्रूपची स्थापना केली. हा पक्ष नाही. यात २६ पक्ष आहेत. त्यातील अनेक पक्ष वेगवेगळ्या राज्यात सत्तेवर आहेत. या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अतिशय नेटाने प्रयत्न केला. हे २६ पक्ष एकत्रित आल्यावर आमच्या अनेक विद्वान पत्रकारांनी त्या त्या पक्षांना मागील निवडणुकीत किती टक्के मते मिळाली याची बेरीज केली. नंतर भजपच्या एनडीएला किती टक्के मते मिळाली याची बेरीज केली. ही सर्व बेरीज करून एनडीएपेक्षा इंडियाच आघाडीवर आहे, असे गणित जमवले. या २६ पक्षांपैकी आप याला राज्यसभेसाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज होती म्हणून त्याने इंडियात प्रवेश केला होता.

काँग्रेसने संपूर्ण समर्थन देऊनही आप ची खिचडी काही शिजली नाही. त्यामुळे की काय मागच्या दोन्ही बैठकांना हजर राहणाऱ्या आपला स्वबळाची पुन्हा घमेंड झालेली दिसते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या सर्व ठिकाणी आपण आपले उमेदवार उभे करू, असे त्या पक्षाचे म्हणणे आहे. काँग्रेसचे काही बोलके पोपट पंजाब आणि दिल्लीत आपण सर्व जागा लढवाव्या यासाठी शड्डू ठोकून आहेत. ही सर्व मंडळी उच्च स्तरावरील नाहीत हे त्यातल्या त्यात बरे आहे. पण आपण एक वेळा ज्या तंबूत गेलेलो आहोत त्या तंबूत जे जातील त्याप्रमाणे आपल्याला वागावे लागेल हे आप ला समजेल काय? भगवान श्रीकृष्णाचा ज्येष्ठ पुत्र प्रद्युम्न याचा जन्म झाला आणि जन्मल्यानंतर तो मोठा झाला होता. आप चेही असेच झाले आहे.

अण्णांच्या आंदोलनातून या पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे राज्य हाती आले. त्यानंतर काँग्रेसच्या घोडचुकांपायी आणि सिद्धूसारख्यांच्या मागे लागून काँग्रेसने आपला पराभव करून घेतला. आता भारतात कुठेही निवडणूक असली की अखिल भारतीय स्वरूपात पक्ष पोहोचल्यामुळे या पक्षाला लढण्याची खुमखुमी येते. परंतु असे करताना आम्ही वर म्हटल्याप्रमाणे इंडियातील सर्व पक्षांच्या मतांची जी बेरीज आहे तिला फाटे फुटतात हे यांना कोण समजावून सांगणार? आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात मुकाबला आहे तो भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये. यात आप पक्ष घुसला म्हणजे भाजपला खास फायदा होणार हे लिहून ठेवा. या सर्व पक्षांनी कितीही गमजा केल्या तरी आजही या सर्व पक्षांपेक्षा मोदी भारी आहेत. नुकतेच टाइम्स नाऊ ने केलेल्या सर्वे क्षणानुसार आता निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पक्षाला ३०० च्या आसपास जागा मिळतील तर इंडियाला २०० जागा मिळतील. असे असले तरी मतांच्या टक्केवारीबाबत फारसा फरक नाही.

एनडीएला ४२ टक्क्यांवर मते तर इंडियाला ४० टक्क्यांवर मते मिळतील. एनडीएच्या ४२ टक्के मतांपैकी ३८-४० टक्के मते फक्त भाजपची आहेत हे विसरता कामा नये. इंडियातील मते ५-६ दमदार पक्षांची आहेत. यातून एक – दोन पक्ष जरी बिथरले तरी इंडियाचे स्वप्न भंगू शकते. म्हणजे एकसंध एनडीए विरुद्ध डळमळीत इंडिया किंवा खिळखिळीत इंडिया किंवा दलदलीत इंडिया असा मुकाबला होऊ शकतो. पहिली गोष्ट ही की, मोदी यांच्या नावाचे वलय अजूनही कायम आहे. दुसरी गोष्ट भारताच्या मध्य भागातून म्हणजे नागपुरातून उदय पावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सार्वदेशिक प्रभावाला विसरून चालणार नाही. अशा प्रकारे ही लढाई आजही भाजपच्या बाजूनेच झुकलेली आहे. याबाबतीत आम्ही तर भ्रमात नाहीतच, इतरांनीही उंटावर बसून शेळ्या हाकणे योग्य नाही हे समजून घ्यावे. आजच्या नंतर पुढच्या ७-८ महिन्यांत जसे राहुल गांधी जादू करू शकतात तशीच जादू नरेंद्र मोदी आणि अमित शहाही करू शकतात. म्हणून आम्हाला असे वाटते की खपवळर ढहरीं खी इहरीरीं आपण जिंकून टाकू अशा भ्रमात या इंडियाने समजून असावे. यामुळेच इंडियातील आप वगैरे पक्षांनी बोलताना सांभाळून बोलावे. काँग्रेस पक्षालाही आपल्या उत्साही बोलघेवड्यांना लगाम लावला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *