मुंबई, दि.२२। प्रतिनिधी कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांनी उडी घेतलीय. केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी पवारांनी केलीय. २४१० रुपयांचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. यात त्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची भूमिका पवारांनी घेतलीय. कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करण्याची मागणीही शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात शुल्कावर ४०% कर लादल्याने नाशिकच्या सर्व बाजारसमित्यांमध्ये कांदा खरेदी बंद आहे. खरेदी बंद असल्यामुळे कांदा तीनशे रुपयांनी घसरलाय. कांद्याचा भाव २००० ते २४०० च्या दरम्यान आला आहे.