गणेश मंडळांकडे भाडे आकारू नये

मुंबई, दि.२४। प्रतिनिधी गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडपासाठी भाडे आकारण्यात येऊ नये. सर्व महापालिका हद्दीतील मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी गणेश मंडळांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सव समितीच्या सदस्यांवर गणेशोत्सवात दाखल झालेले गुन्हे माफ करावे तसेच विसर्जन घाटावर मोठी जागा उपलब्ध करावी, अशा विविध मागण्या गणेशोत्सव मंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि मुंबई आयुक्त यांच्यासोबत सर्व मुंबईतील गणेशोत्सव समितींनी संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. मंडळांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ओशासन अजित पवार यांनी मंडळांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

ठाणे जिल्हा समन्वय संस्था, मुंबई गणेशोत्सव समिती, अखिल भारतीय सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र आणि कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्था यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बुधवारी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात भेट घेऊन ठाणे जिल्हा, कल्याण आणि मुंबई उपनगर या विभागात गणेशोत्सादरम्यान भेडसावणाऱ्या समस्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे,अखिल भारतीय उत्सव समिती महाराष्ट्र अध्यक्ष हितेश जाधव, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे अध्यक्ष समीर सावंत आणि कल्याण शहर गणेशोत्सव संस्थचे संदीप पंडित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *