ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

मुंबई, दि.२४। प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा ेशास घेतला. त्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. ज्यानंतर त्यांची आज (ता. २४ ऑगस्ट) प्राणज्योत मालवली. मागील वर्षी २ फेब्रुवारी २०२२ ला त्यांचे पती आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले होते. वांर्द्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा ेशास घेतला. रमेश देव आणि त्यानंतर आता सीमा देव यांच्या निधनाने मराठी सृष्टीतील एव्हर ग्रीन जोडी कायमची काळाच्या पडद्याआड गेली आहे, असे म्हणावे लागेल. मागील तीन वर्ष सीमा देव या अल्झायमर (स्मृतीभंश) या आजाराने पीडित होत्या. घरातच त्यांचे कुटुंबीय यांची काळजी घेत होते.

आज सकाळी झोपेतच त्यांची प्राणज्योत माळवली अशी माहिती त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी महानगर बरोबर बोलताना दिली. सीमा देव यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती रमेश देव यांच्याबरोबर. पुढे त्यांनी रमेश देव यांच्याबरोबर संसार देखील थाटला. ही देव जोडी एकत्र पाहणे म्हणजे चित्रपट प्रेमींना एक पर्वणीच असायची. सीमा देव यांच्या मागे अभिनव आणि अजिंक्य ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रमेश देव यांना जाऊन जेथे दीड वर्ष देखील झाले नाही. तेथे सीमा देव यांच्या जाण्याने देव कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *