मुंबई, दि.१। प्रतिनिधी हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, हे सत्य आहे. आरएसएस हे नक्की करेल, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, यात काही आक्षेप नाही, पण सर्व भारतीयांची काळजी करा. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, देशातील वैचारिकदृष्ट्या सर्व जण हिंदू आहेत. काही लोकांना समजले आहे आणि काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.