नवी दिल्ली, दि.१। वृत्तसंस्था रेल्वे बोर्डाच्या पहिल्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यांनी अनिलकुमार लाहोटी यांची जागा घेतली. रेल्वे बोर्डाच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची बोर्डाच्या चेअरपर्सन आणि सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिन्हा हे यापूर्वी रेल्वे बोर्डाचे संचालन आणि व्यवसाय विकास सदस्य होते. लाहोटी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष म्हणून रेल्वेने चार जणांचे पॅनल तयार केले. त्याच पॅनलने जया वर्मा यांना नवे अध्यक्ष बनविण्यास सहमती दर्शवली. जया ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत या पदावर राहतील.ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताच्या वेळी जया यांनी सरकारला घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. या घटनेचे पॉवर प्रेझेंटेशनही त्यांनी पीएमओमध्ये दिले. या घटनेदरम्यान जया वर्मा यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.