मुंबई, दि.१। प्रतिनिधी केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यासाठी समिती स्थापन केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्याचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. त्याची अधिसूचना आज जारी होऊ शकते. केंद्र सरकारने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. एक देश, एक निवडणूक यावरही सरकार विधेयक आणण्याची शक्यता आहे. केंद्राने स्थापन केलेली समिती वन नेशन वन इलेक्शनच्या कायदेशीर बाबी पाहणार आहे. शिवाय यासाठी सर्वसामान्यांचे मतही घेतले जाणार आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा कोविंद यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र, या भेटीचे कारण समोर आलेले नाही. येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकारला अचानक एक देश एक निवडणुकीची गरज का पडली.