साठी दिल्लीमध्ये जगातील ८० टक्के शक्ती एकवटणार!

नवी दिल्ली, दि.१। वृत्तसंस्था देशाच्या राजधानीत जगभरातील दिग्गजांच्या भेटीगाठी होणार आहेत. निमित्त आहे-जी २० परिषदेचे. ९ व १० सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह २९ देशांचे प्रमुख सहभागी होतील. देशातील हे सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे जागतिक आयोजन ठरेल. कारण जी-२० देशांची जगातील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के, एकूण जीडीपीत ८० टक्के व एकूण व्यापारात ७५ टक्के भागीदारी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्राध्यक्ष व १४ आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख भारतात एकाच मंचावर येतील. भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० होत आहे, हे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *