मुंबई, दि.४। प्रतिनिधी विरोधकांनी सरकारने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (शिंदे, फडणवीस, पवार) राजकारण सोडू. अन्यथा तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विरोधकांना दिले.मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधी मंत्रालयातून आलेल्या आदेशांनुसार आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेषतः उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या पोर्शभूमीवर अजित पवार यांनी पवारांवर उलटप्रश्नी हल्ला चढवला आहे.