भारत नावासंदर्भात मोदी सरकार विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणणार!

नवी दिल्ली, दि.५। वृत्तसंस्था जी २० शिखर परिषदेनंतर मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार? याबाबत आतापर्यंत केवळ अंदाज बांधले जात होते. मात्र आज ज्या घडामोडी समोर आल्या आहेत, त्यामुळे संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान केंद्र सरकार देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. तसेच केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडियाचे नाव बदलून भारत करण्याचा नवा प्रस्ताव मांडू शकते, अशीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, मोदी सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाइव्ह मिंटने दिलेल्या माहितीनुसार, णउउ आणि “एक राष्ट्र, एक निवडणूक’ नंतर आणखी एक अंदाज वर्तवला जात आहे, जो कलम ३६८ अंतर्गत घटनादुरुस्तीद्वारे आपल्या राष्ट्राच्या नावात “इंडिया’वरून “भारत’ असा अधिकृत बदल करण्याकडे निर्देश करतो. राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी २० शिखर परिषदेसाठी पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. ज्यामध्ये “प्रेसिडंट ऑफ इंडिया’ऐवजी “प्रेसिडंट ऑफ भारत’ हा शब्द वापरण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने निमंत्रण पाठवल्याबद्दल काँग्रेसने मंगळवारी सरकारला फटकारले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया ट्विटवर लिहिले की, “तर ही बातमी खरोखरच खरी आहे. राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी २० डिनरसाठी “प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी “प्रेसिडेंट ऑफ भारत’च्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. जयराम रमेश पुढे म्हणाले की, राज्यघटनेतील कलम १ नुसार, भारत, जो इंडिया होता, तो राज्यांचा एक संघ होता. परंतु आता या राज्यांच्या संघराज्यवरही आक्रमण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *