नागपूर मार्गे पुणे जाणारी ‘ही’ रेल्वे पुढील दोन दिवस रद्द; या तीन गाड्यांचे मार्गही बदलले

नागपूर मार्गे धावणारी कोल्हापूर – गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस उद्या, 26 आणि 27 जानेवारी हे दोन दिवस धावणार नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम तसेच कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वेगाडीला 26 आणि 27 जानेवारीला तर 28 आणि 29 जानेवारीला गोंदिया ते कोल्हापूरला दोन दिवस ब्रेक दिला जाणार आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसला रद्द करण्यासोबतच तीन रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यानुसार 12130 हावडा – पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस 26 जानेवारीला आणि 22846 हटिया पुणे एक्स्प्रेस 27 जानेवारीला नागपूर, बल्लारपूर, काजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला पोहोचणार आहे. अशाच प्रकारे 12221 पुणे हावडा दुरंतो एक्स्प्रेस 28 जानेवारीला दौड, वाडी, सिकंदराबाद, काजीपेठ, बल्लारपूर नागपूर मार्गे हावडा स्टेशन गाठणार आहे. 28 जानेवारीला 12129 आझाद हिंद एक्स्प्रेस पुणे हावडा साईनगर शिर्डी येथून पाच तास उशिराने धावणार आहे. 22893 साईनगर शिर्डी हावडा एक्स्प्रेस 28 जानेवारीला 4 तास उशिराने धावणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *