अत्याधुनिक आणि स्वदेशी वंदे भारत एक्स्प्रेससह (Vande Bharat Express) इतरही रेल्वे गाड्यांवर दगडफेक केली जात आहे. अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. समाज कंटकांकडून असा खोडसळपणा केला जात आहे. मात्र, त्यांच्या आनंदात दुसऱ्यांचा जीव धोक्यात येतो. शिवाय रेल्वेच्या संपत्तीचेही नुकसान होत आहे. या घटनांवर आळा घालण्यासाठी दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेने कंबर कसली असून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.