औरंगाबाद , दि.०७। प्रतिनिधी अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री तथा प्रथम महिला हिलरी क्लिंर्टन यांचे आज दुपारी औरंगाबादेत विशेष विमानाने आगमन झाले. गुजरात दौऱ्यावर आलेल्या हिलरी यांचे आज औरंगाबादेत विशेष विमानाने आगमन झाले. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान त्यांचा इथे दोन दिवस मुक्काम असणार आहे. वेरुळ लेण्या आणि घृष्णेेशर मंदिराला त्या भेट देणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, हिलरी यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
खुल्ताबाद तालुक्यातील एका फार्मवर त्यांचा मुक्काम असणार आहे. या ठिकाणी देखील विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री असलेल्या हिलरी क्लिंर्टन या १९९३ ते २००३ या काळात अमेरिकेच्या प्रथम महिला म्हणून कार्यरत होत्या. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून विशेष विमानाने त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर प्रचंड पोलिस बंदोबस्तात त्या खुल्ताबाद तालुक्यातील ध्यान फार्मस येथे रवाना झाल्याची माहिती आहे.