साहित्य हे माणसाच्या केंद्रस्थानीः तुळशीराम बोबडे

अकोला,दि.१३ (प्रतिनिधी)ः तरुणई फाऊंडेशन, कुटासा व शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग अकोलाच्या वतीने रविवारी १२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते रात्री १० दरम्यान (कै.) डॉ. ज. पा. खोडके साहित्य नगरी, वसंत सभागृह शिवाजी महाविद्यालय येथे तिसèङ्मा अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. माणूसच साहित्याच्या केंद्रस्थानीअसला पाहिजे साहित्यिकांनी कुणालाही न भिता आपले लिखाण सुरूच ठेवले पाहिजे अकोला जिल्ह्याला साहित्यिक परंपरेचा खूप मोठा वारसा असून बाजीराव पाटील,विठ्ठल वाघ, गिरी सारखे दिग्गज या जिल्ह्याला लाभलेले असून यांनी हा जिल्हा सहिल्यासाठी सुजलाम सुफलाम केला आहे. माणसाच्या जगण्याचे दुःख साहित्यात आले पाहिजे नवोदित साहित्यिकांनी जेष्ठ साहित्यिकांचे पुस्तके वाचून आपली साहित्यिक भूक भागवावी व सकस असं साहित्य लिखाण करावं या ठिकाणी ह्या साहित्यिकांकडून सकस व दर्जेदार लिखाणाचीअपेक्षा ठेवतो असे प्रतिपादन तिसèङ्मा अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे, यांनी व्यक्त केल्या तर संमेलनाचे उद्घाटक डॉ. गजानन नारे यांनी जिल्हा संमेलनाविषयी चळवळ ही भविष्यात अकोला जिल्ह्याच्या इतिहासात नोद् करणारी चळवळ ठरावी असे प्रतिपादन करून उद्घाटन केले.

स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव अंधारे आ.अमोल मिटकरी, म.रा.सांस्कृतिक व साहित्य मंडळ मुंबईचे पुष्पराज गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, समाजसेवक डॉप्रा. संतोष हुशे, उद्योजक सुगत वाघमारे, प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुलभा खर्चे तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक संदिप देशमुख, कार्यवाह प्रा. डॉ. गणेश मेनकार, कार्याध्यक्ष शंकर जोगी, सचिव प्रा. देवानंद गावंडेसह, आधी विचार पिठावर उपस्थितहोते त्यावेळी नारायणराव अंधारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशनसंमेलन विषयनांकतसेच संमेलन विषयक दहूत लेखणी या मासिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाèङ्मा समाजसेवकांना प्रतिनिधित्व स्वरूपात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रस्ताविक संस्थापक संदीप देशमुख तर संचालन मनोज देशमुख तर आभार प्रदर्शन गणेश मेनकार या नी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *