अकोट,दि.१३ (प्रतिनिधी)ःश्री संत गजानन महाराज संस्थान शांतीवन अमृत तीर्थ अकोलखेड येथे प्रगट दिनानिमित्त श्रींच्या दर्शनास लाखोच्या वर भाविकांनी गμर्दी केली होती. सकाळी पाच वाजता पासून श्रींच्या दर्शनार्थ भाविकांनी रांगा लावल्या होत्या. तीन वर्षाच्या कोरोना खंडानंतर यंदा सार्वजनिक प्रगट दिन उत्सवाची यात्रा भरल्याने शांतीवन अमृततीर्थ परिसर हा श्री भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला होता.सकाळी श्रींना महाभिषेक आरती करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या मुखवटा व पादुकांची नगर प्रदक्षिणा पार पडली तदनंतर ९ ते ११ वाजेपर्यंत ह भ प महेंद्र महाराज नलावडे यांचे काल्याचे किर्तन पार पडले प्रगट दिन उत्सवासाठी यावेळी मंदिरावर अनेक ठिकाणच्या पालख्यांचे आगमन झाले होते, श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन उत्सवासाठी यावेळी विहीर मार्गावर अनेक सेवाभावी मंडळ संस्था संघटना यांनी चहा फराळ महाप्रसादाचे आयोजन केले होते.
संस्थान द्वारा यावेळी भाविकांना श्रीच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती श्रींचा महाप्रसाद संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही वृत्तान्कानापर्यंत सुरूच होता महाप्रसादात ३० क्विंटल भाजी ४० क्विंटल पोळ्या २० क्विंटल पोळ्या २० क्विंटल बुंदी २५ क्विंटल भात वितरण करण्यात आले. महाप्रसादासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा बघता यंदा श्रींचा प्रगट दिन उत्साह अन्नपूर्णा उत्सव ठरत असल्याचे चित्र दिसत होते.श्री संत गजानन महाराज संस्थान विहीर येथे दर्शनार्थ जाणाèङ्मा भाविकांच्या सुविधेसाठी आकोट येथून चालक-मालक वाहतूक संघटने द्वारा मोफत वाहन प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सेवेचा अनेकांनी लाभ घेतला.मंदिर परिसरात यावेळी भव्य यात्रा प्रगट दिनानिमित्त भरली होती प्रगट दिन उत्सवा मुळे यावेळी मंदिर परिसरात गृहपयोगी वस्तू खेळणे, पूजा साहित्य, खाद्यपदार्थ यासह अनेक वस्तूंचे दुकाने लागली होती. मंदिर परिसरातील एक किलोमीटर पर्यंत भाविकांनी पायदळ प्रवास करत श्रींच्या दर्शनार्थ वारी केली. तर अनेक श्रद्धाळू भाविकांनी सकाळपासूनच आकोट येथून श्रींच्या मंदिरापर्यंत पैदल वारी करून दर्शन घेतले.