अकोला,दि.१३ (प्रतिनिधी) अकोला क्रेडाई व अकोला बिल्डर्स असो.ने साकार केलेल्या व एसबीआय व जग्वारच्या सहकार्याने स्थानीय क्रिकेट क्लब मैदानात सुरू असलेल्या चार दिवसीय मटेरिका २०२३ प्रदर्शनीचे सोमवारी रात्री रंगारंग समापन करण्यात आले. गृहनिर्माण व बांधकाम विेशातील शंभरहुन अधिक स्टॉल असलेल्या या प्रदर्शनीस अकोलेकरांचा उत्स्फफूर्त प्रतिसाद मिळाला .या समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते.यावेळी मंचावर एसबीआयच्या प्रतिनिधी मंजुषा जोशी, जग्वारचे प्रतिनिधी चेतन खंडेलवाल, क्रेडाईचे अध्यक्ष दिनेश ढगे, उपाध्यक्ष सुशील खोवाल, उपाध्यक्ष जितेंद्र पातुरकर, सचिव शरद सावजी आदी मान्यवर उपस्थित होते. या समारोपीय सोहळ्यात उत्कृष्ट स्टॉलधारकांचा गौरव करीत त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या अभिनव प्रदर्शनीचे कौतुक करीत ही प्रदर्शनी नागरिकांच्या गृहनिर्माण संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम असल्याचे मनोगत व्यक्त करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. मान्यवरांचे स्वागत क्रेडाई अध्यक्ष प्रा. दिनेश ढगे, नितीन हिरुळकर, नितीन लहरिया यांनी केले.
संचालन कपिल रावदेव यांनी तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष जितेंद्र पातूरकर यांनी मानलेत. यावेळी समस्त स्टॉल धारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मटेरिका २०२३ च्या सफलतेसाठी क्रेडाईचे अध्यक्ष दिनेश ढगे, उपाध्यक्ष सुशील खोवाल, उपाध्यक्ष जितेंद्र पातुरकर, सचिव शरद सावजी, कोषाध्यक्ष सुरेश कासट,कार्यक्रम समनव्यक शैलेंद्र व्यास, आनंद बांगड, दिलीप चौधरी, संतोष मोहता, अभय बिजवे, धर्मेंद्र सनेना, मनोज महाजन, मो.जावेद, कपिल रावदेव, सौ. नितीशा कोठारी, डॉ. सविता अग्रवाल, सुनील हातेकर, नितीन हिरुळकर, प्रकाश सोमाणी, मनोजसिंह बिसेन, अनिल ताकवाले, अमित अग्रवाल, किरण कुलकर्णी, सतीश धनोकार, नितीन लहरिया, अमरीश पारेख, मुकेश माळी, अमोल पाटील, रश्मीकांत शाह, विजय बोर्डे, अनुराग अग्रवाल, प्रवीण शिंदे, पंकज कोठारी, प्रा. इस्माईल नाजमी, राजेश लोहिया, मो. फाजील, माधव कोठारी, पी.के. शर्मा, शब्बीर शामलक, पुरुषोत्तम मालाणी, संजय तुलशान, मनोज सुरेका, पवन जैन, सिद्धार्थ जैन, अंकित अग्रवाल, पंकज कासट, सचिन कोकाटे, संजय अग्रवाल, महेंद्र दवे, अशोक नागपुरे, श्रीधर काळे, नवनीत लखोटीया, किशोर अग्रवाल, सुमित मालाणी, सुनिल ईंनानी , नितीनकुमार गनात्रा समवेत क्रेडाई अकोला,अकोला बिल्डर्स असो.च्या समस्त पदाधिकाèङ्मांनी मेहनत घेतली.