हिंगणघाट,१३ दि.प्रतिनिधी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हान यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनजागरण यात्रा हिंगणघाट येथे पोहचली. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौक येथे सभा घेण्यात आली.या जनजागर यात्रेला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. याकार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्य निरीक्षक डॉ.आशा मिरगे, विभागीय अध्यक्ष डॉ.सुरेखा देशमुख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख आदीची उपस्थिती होती. महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न, सिलिंडर दरवाढ, पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. जनतेला एल्गार करण्यासाठी जनजागरण यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्याचे मत युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी व्यक्त केले. सत्तेचा गैरवापर करत ही सरकार स्थापन झाले असून महाराष्ट्रात बेरोजगारी, दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कबंरडे मोडले आहे. सरकारमुळे बेरोजगार युवकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे.
केंद्र सरकार जाती धर्मात तेढ वाढवून सत्तेच्या गैरवापर करत असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात डॉ.आशा मिरगे यांनी व्यक्त केले.यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग,माजी सरपंच प्रशांत घवघवें, समाजसेवक अनिल लांबट, विजय तामगाडगे,पुरुषोत्तम कांबळे यांची उपस्थिती होती. याकार्यक्रमाचे संचालन सुचिता सातपुते तर आभार शबुक्ता शेख यांनी मानले. या कार्यक्रमाला आयोजनाकरिता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हिंगणघाट शहर अध्यक्षा मृणाल रिठे, विधानसभा अध्यक्ष निता गजबे, उपाध्यक्ष सिमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष सविता येळणे, उपाध्यक्ष कविता मुंगले, जिल्हा सचिव भारती घुगंरुड, सरचिटणीस सुजाता जांभुळकर, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख , उपाध्यक्ष रजनी महाकाळे, तालुका उपाध्यक्ष मिनाक्षी धाकने, तालुका सचिव सुचिता सातपुते, शहर सचिव अर्चना नांदूरकर, माधवी देशमुख आदींनी सहकार्य केले.