आर्वी,१३ दि.प्रतिनिधी आर्वी शिरपूर मार्गावर एलआयजी कॉलनी नजीक जीवन प्राधिकरणाद्वारे पाईपलाईन टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम केले. रस्ता खोदकामामुळे शिरपूरला जाणारी बस तसेच इतरही जड वाहनाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परंतु गावात नियमित बस येत नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना बसत आहे. परिणामी जीवन प्राधिकरणाद्वारे तत्काळ पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करावे व वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ करीत आहे. पंधरा दिवसापासून आर्वी शिरपूर जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने पाईपलाईन टाकण्याचे खोदकाम सुरू असून या मार्गावरचा रस्ता पूर्णच खोदून ठेवल्याने पंधरा दिवसापासून परिवहन विभागाची बस गावात पोहोचलीच नाही. यामुळे शिरपूर गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून खोदकाम सुरूच असून आम्ही शाळेत कधी जायचे असा सवाल विद्यार्थी करीत आहे.
शिरपूर गावातील विद्यार्थ्यांसाठी सकाळी दहा वाजताची बस आहे. परंतु पाईपलाइन टाकणे सुरू असल्याने रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने जडवाहने, तसेच बससेवा ठप्प झाली आहे. नियमित येणारी बससेवा बंद असल्याने शिरपूर गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आता लवकरच दहावी व बारावीच्या परिक्षा सुरू होणार आहे. परंतु या रस्त्यावर खोदकाम सुरू असल्याने बस सेवा बंद पडली आहे या गावातील इयत्ता पाचवी ते महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील गावकर्यांना याच बसचा आधार असल्याने ते आर्वीला येत असतात. विविध शाळेत आर्वीला येत असतात परंतु गेल्या पंधरा शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने ये जा करावे लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आर्वीला जान्याकारिता शिरपूर परिसरतील इतरही गावकर्यांना देखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.