आज वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. शानदार व्यवस्था, ज्ञानदार कार्यक्रम आणि वैभवशाली बडदास्त अशी कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे संमेलन स्मरणीय झाले, उत्तम झाले, असे म्हणणे भाग आहे. या एका महिन्यात विेश मराठी साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, विद्रोही मराठी साहित्य संतलन आणि वर वर्णन केलेले नुकतेच संपलेले संमेलन असा संमेलनांचा चौकार आपण बघितला. ही सर्व संमेलने श्रवणीय होती, रमणीय होती. मराठी भाषेच्या घोर उपेक्षांमुळे qचतनीय ठरली होती. आपल्या मराठी साहित्य संमेलनात अनेक ठराव पारित केले जातात. अनेकदा तेच ते ठराव आपले भाषाप्रभु मांडत असतात. अनेकदा भांडतही असतात. अनेक प्रस्ताव येतात पण त्यांना कवडीचीही qकमत दिली जात नाही. याच संमेलनात मराठवाडा साहित्य परिषदेने दिलेले प्रस्ताव नाकारण्यात आले. अशा प्रकारे घडामोडी घडत असताना साहित्य संमेलनांची श्रीमंती पेशवाईतील रमण्यांप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाधिक उंचीवर जात आहे. आम्ही ज्या चार संमेलनांचा उल्लेख केला त्यापैकी पहिले संमेलन खुद्द सरकारद्वारे प्रायोजित होते. सरकारने संमेलन प्रायोजित केले म्हणून आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाराज झाल्याचे त्यांनीच सांगितले. या संमेलनांखेरीज प्रादेशिक संमेलने, जिल्ह्यातील संमेलने, नवोदितांची संमेलने मराठी भाषेचा झेंडा ङ्कडकवित सतत होत असतात.
आपल्या उत्सवप्रिय समाजाला उत्सवांवर उत्सव करण्याचे कार्य सङ्कल करावे लागते. आम्हाला एका गोष्टीचे मोठे नवल वाटते आणि qचताही वाटते. ती गोष्ट ही, या संमेलनांचा सोपस्कार पार पाडल्यावर मराठी भाषेचे आणि मराठी साहित्याची पताका गगनाला सोडा संमेलनांच्या मंडपापर्यंतही ङ्कडकत नाही हे आपल्या मराठी भाषेचे, मराठी साहित्याचे चित्र आहे. हे चित्र विचित्र असले तरी खरे आहे, यात वाद नाही. आपल्या सरकारपासून मराठीच्या नावावर उभ्या राहिलेल्या संस्था या सर्वांना याची कल्पना आहे. पण धडपणे कोणी हे बोलत नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? आम्ही संमेलनांच्या विरुद्ध नाही, संमेलने झालीच पाहिजेत. पण या संमेलनांना शाब्दिक कसरतींशिवाय कोणी वालीच नाही असे दिसून आले तर या संमेलनांना अर्थ काय? ही संमेलने बघून श्रीमंती थाटाच्या पंगती आणि चार-सहा परिसंवाद, दोन-पाच कवी संमलने आणि पुढाèयांच्या उपदेशाचे बोध यामध्ये साहित्य संमेलनांचा समाजासाठी काय उपयोग आहे? मराठी भाषेच्या उन्नतीसाठी काय उपयोग आहे?
याचाही विचार केला पाहिजे. आज भाषिक राज्यांमध्ये मराठी सोडून महाराष्ट्र सोडून इतर राज्यात त्या त्या राज्याची भाषा शिकणे आवश्यक झालेले असते. मात्र आपल्या महाराष्ट्रात मराठी नाही आली तरी चालते, असे प्रसिद्ध दिग्दर्शक वासू भट्टाचार्य म्हणतात ते काही खोटे नाही. पुन्हा महत्त्वाची बाब अशी की, संमेलन झाले रे झाले की, या संमेलनाच्या अध्यक्षाला काहीच qकमत नसते. वर्धेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगांवकर यांना पोलिसांनी अडविण्याचा पराक्रम केला होता, अशी बातमी पण वाचनात आली आहे. सरकारने दुकानदारांना आपले ङ्कलक मराठी भाषेत लिहिण्याचे बंधन घातल्यामुळे ङ्कलक मराठीत लिहिले जातात. पण बहुतेक दुकानदारांना मराठी बोलता येत नाही, अशी परिस्थिती आहे. आपली मुले, नातवंडे मराठी शाळेत शिकविण्यास आपला अपमान समजतात. त्यांचे आजी-आजोबा आणि आई-वडील त्यांना इंग्रजी भाषेत शिकविण्यासाठी अक्षरशः हजारो रुपये ङ्की देतात. मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांची अवस्था बघितली तर संमेलने जोमात आहेत आणि मराठी भाषा, मराठी साहित्य कोमात आहे असे म्हणावेसे वाटते. आम्ही काही कमीजास्त लिहिले असेल तर आम्ही क्षमाप्रार्थी आहोत.
जय मराठी! जय मराठी साहित्य!